अमळनेर : पोलीस वृत्त ऑनलाइन: तालुक्यातील फापोरे येथील एका २९ वर्षीय तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी सव्वा सात वाजेच्या सुमारास घडली.
अक्षय घनश्याम पाटील वय २९ रा फापोरे बुद्रुक याने राहत्या घराच्या वरच्या पत्र्याच्या खोलीत लोखंडी अँगल ला ओढणी बांधून गळफास घेतला. दीपक तुकाराम पाटील वय ४५ यांनी फिर्यादीत म्हटले आहे की अक्षय चे लग्न होत नसल्याने त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. अमळनेर पोलीस स्टेशनला नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.