चोपडा : पोलीस वृत्त ऑनलाइन येथील सातपुडा पर्वतरांगामधील मालापूर शिवारातील शेतात गांजाची लागवड करण्यात आली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून ७५० किलोग्रॅमचा गांजा रुपये ४५ लाखांचा गांजा जप्त केला. दरम्यान, संशयित आरोपी फरार झाला असून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालापूर शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली असल्याची गुप्त माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार रविवारी (दि.६) चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी पथकासह या ठिकाणी छापा टाकला. यादरम्यान शेतात ७५० किलोग्रॅमचा ओला गांजा मिळून आला. हा गांजा पोलिसांनी जप्त केला असून त्याची किंमत जवळपास ४५ लाख रुपये आहे. संशयित आरोपी रुमल्या चेचऱ्या पावरा (रा. डॅडीया पाडा ह. मु. चोपडा) यांच्या शेतात गांजाची शेती आढळून असून पोलिसांची कुणकुण लागताच हा संशयित आरोपी फरार झाला. याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल चेतन सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.