धुळे: पोलीस वृत्त ऑनलाईन- सोनगीर दोंडाईचा राज्य महामार्ग क्रमांक एकवर चिमठाणे (ता. शिंदखेडा) गावाजवळ बडोदा – धुळे बस व मालवाहतूक आयशर यांच्यात शुक्रवारी (ता. १३) दुपारी चारच्या सुमारास समोरासमोर झालेल्या अपघातात बसमधील दोन लहान बालक, १३ महिला व नऊ जण, तर आयशरचालक असे एकूण २५ प्रवासी जखमी झाले आहेत.
चार गंभीर जखमीसह २० प्रवासी यांना धुळे जिल्ह्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, किरकोळ पाच जखमीवर चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी दुपारी चार वाजून दोन मिनिटांनी धुळे आगारांची बडोदा- धुळे एसटी बस (एमएच २०, बीएल २५९७) धुळेकडे जात असताना व सोनगीरकडून दोंडाईचाकडे जाणारी आयशर (एमएच १८, बीझेड ००२६) यांच्यात चिमठाणे गावाजवळ समोरासमोर झालेल्या अपघातात बसमधील रंजिता सावंत (वय ४२, रा. धुळे), तुषार पाडवी (वय ३१, रा. तळोदा), रिहान अली (वय २०, रा. छत्रपती संभाजीनगर) व आयशरचालक संदीप पाटील (वय ३५, रा जुनवणे, ता. धुळे) यांना गंभीर जखमी झाल्याने धुळे येथील जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
तसेच चंद्रकांत शिरोळे (वय ६२, नगरदेवळा), विमल भिल (वय ७०, तळोदा), कविता भोई (वय २५ तळोदा), गुलशनबी खाटीक (वय ४०, धुळे), गालिफ खाटीक (वय ४५, रा. धुळे), शाहिदाबी शेख फ़रीद (वय ६५, रा शिंदखेडा), सायंकाबाई पवार (वय ६७, दराणे, ता. शिंदखेडा), योगिता वसावे (वय २७, अक्कलकुवा), आयुषी तवर (वय २१ तळोदा), अजित खान सलील खान बेलदार (वय ४२ दोंडाईचा), आधार भावसार (वय ७०, रा. एरंडोल), वैशाली पाटील (वय ४०, निशाने, ता. शिंदखेडा), दिलीप पाटील (वय ६१, शेवगाव), नाना पाटील (वय ६५, खर्दे, तलवाडे), मनीषा पवार (वय २८, मंदाणे, ता. शहादा), प्रियांशी पवार (वय ३ वर्ष, मंदाणे) यांना धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी पाठवीण्यात आले आहे.