अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाइन – मुडी प्र. डांगरी तरुण मामाकडे गावी गेला असताना तापी नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. १४ रोजी ही घटना घडली. उमेश कैलास सोनवणे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह १६ रोजी तापी नदी पात्रात तोरखेडा ता शहादा जवळ आढळून आला. गिधाडे ता. शिरपूर येथे मामाच्या गावी गेलेला असताना मामाच्या घरातील कुटुंबाला निरोप देऊन निघालेला उमेश सोनवणे याने १४ रोजी रस्त्यातच मुडी प्र. डांगरी येथे येत असताना सव्वाबाराच्या सुमारास गिधाडे गावाजवळ पुला वरून उडी मारून आत्महत्या केली. तो उडी मारत असताना गिधाडे येथील एका व्यक्तीने ही माहिती त्याच्या कुटुंबियांना दिली घटना घडल्यापासून त्याच्या कुटुंबीय नदीपात्राच्या गावात शोध घेत होते. त्याचा मृतदेह तारखेडा ता. शहादा येथे सापडला त्याच्या आधार कार्ड वरून सारंखेडा पोलिसांनी कुटुंब यांना दिली 16 रोजी त्याचे काका शरद उत्तम सोनवणे यांनी याबाबत खबर दिल्यावर पोलिसात गुन्हा नोंद झाला. नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेऊन सायंकाळीं शोकाकुल वातावरणात त्याच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आला.


