चोपडा : पोलीस वृत्त ऑनलाईन तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आले आहे. ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून नंतर तिच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना तालुक्यातील एका गावात शनिवारी सायंकाळी सात वाजता घडली. यात एका संशयितास अटक करण्यात आली आहे.
चोपडा तालुक्यातील एका गावानजीक शेतात एक परिवार वास्तव्यास आहे. यातील ११ वर्षीय मुलगी ही शनिवारी सायंकाळी घराजवळ असताना संशयित तेथे आला. त्याने या मुलीला शेताकडे नेत अत्याचार केला. त्यानंतर डोक्यात दगड टाकून तिचा खून केला.
ग्रामस्थांनी पोलिसांना घटनेची माहिती कळवली. यानंतर चोपडा शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तसेच एलसीबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. बालिकेचा मृतदेह रात्री उशिरा चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी रात्रीच घटनास्थळाची पाहणी केली.