अमळनेर : पोलीस वृत्त ऑनलाईन: शहरात नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनसंवाद यात्रा पार पडली असून शहरात जनसंवाद यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण झाली. शहरात भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्वागताचे फलक संपूर्ण शहरात झळकल्याने शहर गुलाबी झाले. या सगळ्या गोष्टींसाठी हातभार असतो तो कार्यकर्त्यांचा असतो. कुठल्याही पक्षा ची खरी धुरा ही कार्यकर्त्यांवरच आधारलेली असते. राजकारणात निष्ठेला फार महत्व असते. पक्षासाठी आपल्या नेत्यासाठी ठाम पने काम करणारे असे अनेक खंबीर एकनिष्ठ कार्यकर्ते अजूनही आहेत.

जनसंवाद यात्रेनिमित्त अमळनेर शहरात आलेल्या उपमुख्यमंत्री पवार यांचे मंत्री अनील पाटील तसेच पक्षाचे कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोषात स्वागत झाले. अश्यातच एका कार्यक्रमाच्या माध्यमातून स्टेजवर कार्यकर्ते पवारांचे स्वागत करत असताना उपमुख्यमंत्री पवार त्यांची नजर एका कार्यकर्त्याकडे होती. एक टक लावून ते त्या कार्यकर्त्याकडे पाहताहेत असे त्या फोटोतून दिसत आहे. आजही नेत्यांचे लक्षवेध करणारे कार्यकर्ते पक्षात आहेत. आणि तो कार्यकर्ता म्हणजे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर शाखा अध्यक्ष सुनील शिंपी. अमळनेर शहरात चांगल्या परिचयाचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. अन मंत्री अनिल पाटलांचे कट्टर समर्थक गेल्या सोळा वर्षापासून सोबत आहेत. आमदारकी पद नसल्यापासून तर आजवर मंत्रीपद असल्यापर्यंत अनिल पाटील यांच्या सोबतच आहेत. शहरासह तालुक्यात कुठलाही कार्यक्रम असो मंत्र्यांच्या आजूबाजूला ते दिसून येतात. तसेच तालुक्यात पक्षातील कुठलाही नेत्याचा दौरा असला तरी ते मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत पुढेच असतात. तसेच शुभेच्छांच्या बॅनर वरती नेहमी झळकत असतात. सामान्य परिवारातील असलेला सुनील शिंपी यांनी तालुक्यात आजवर शहर अध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष, शहर शाखा अध्यक्ष असे अनेक पदभार सांभाळून पक्षासोबत चांगले कामकाज आहे. आजही ते पक्षासह मंत्री अनिल पाटील यांच्या बाजूने ठाम आहेत. अशा कार्यकर्त्यांविषयी जनतेत नेहमी चर्चा होत असते. उपमुख्यमंत्री यांच्या सत्कार व स्वागत करताना एका फोटोटून अजित पवारांची नजर सुनील शिंपी यांच्याकडे आहे. चित्राच्या माध्यमातून समजत आहे. की येणाऱ्या काळात सुनील शिंपी यांचे देखिल भवितव्य चांगले ठरणार आहे. तर मंत्री अनिल पाटील यांच्यासोबतीचे एक निष्ठेचे फळ त्यांना चांगले मिळणार का? असे या फोटोतून दिसत आहे.


