अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाइन : अमळनेर तालुक्यातील शिरुड येथील स्व: विनायकराव झिपरू पाटील हायस्कूल या ठिकाणी १५ ऑगस्ट रोजी ७८ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हायस्कूल येथील ध्वजारोहण शालेय समितीचे उपाध्यक्ष संतोष काशीराम बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी उपस्थित शालेय समिती शिरुड हायस्कुल, गावातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हायस्कूल या ठिकाणाहून ३०० फूट ध्वजरॅली काढण्यात आली. ही ध्वजरॅली थेट ग्रामपंचायत ते गावातून मिरवण्यात आली. या ध्वजरॅलीने अनेकांचे लक्ष वेधले. “हर घर में तिरंगा लहराना है, हर दिल में देशभक्ति जगाना है।” “तिरंगा सिर्फ झंडा नहीं, ये हमारी आन-बान-शान है।” “तिरंगा लहराएगा, हर घर में देशभक्ति का दीपक जलाएगा. या ध्वज रॅलीत शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी सभाग नोंदविला. या स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील सरपंच व मा.सरपंच,उपसरपंच व सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व सदस्य, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, दत्त वाचनालय अध्यक्ष व सदस्य, दूध संघ तसेच गावातील आजी माजी पदाधिकारी, जेष्ठ ग्रामस्थ, विद्यालयाचे माजी विद्यार्थी व विविध समाजाचे सर्व मित्र मंडळ या ध्वज रॅलीत सहभागी होते