अमळनेर: ( पोलीस वृत्त- ऑनलाईन) स्वतःची जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर लग्नानंतरही स्पर्धा परीक्षेतील तीन पदांना गवसणी घालणाऱ्या जिज्ञासा ज्ञानेश्वर सांगोरे (नायदे) यांचा अमळनेर तालुका धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक तरुणांना प्रेरणा देणारे यश जिज्ञासा ज्ञानेश्वर सांगोरे यांनी संपादित केलेले आहे. त्यांची कनिष्ठ अभियंता तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांवर निवड झाल्यामुळे समाजामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक दिवस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून न्यूनगंडाच्या गर्तेत सापडलेल्या मुलांना प्रेरणा मिळावी असे यश लग्नानंतर संपादित करून तरुणांमध्ये उत्साह निर्माण केलेला आहे. त्यांचा सन्मान समाजासाठी प्रेरणादायी आहे. असे गौरवोद्गार उपस्थित त्यांनी काढले. हरचंद लांडगे, मच्छिंद्र लांडगे, रमेश शिरसाठ, देवा भाऊ लांडगे, गोपाल हडपे, प्रा गजानन धनगर, आनंदा धनगर, शशिकांत आढावे, उमेश मनोरे, बापूराव सांगोरे, अनिल बागुल, भानुदास पाटील संजय धनगर, प्रा मनोज रत्नपारखी, निलेश निळे, सुधाकर पवार, आलेश धनगर, सौरभ भागवत, अनिल न्हाळदे, निखिल बोरसे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.