जळगाव : पोलीस वृत्त ऑनलाईन – आज अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने राज्यातील सर्वच गणेश मंदिरांमध्ये भाविकांचा महापूर ओसंडून वाहत आहे. मध्यरात्रीपासूनच जागृत देवस्थानामध्ये जाऊन भाविकांनी पूजा अर्चा करत विघ्नहर्त्या गणेशाचं दर्शन घेतलं आहे. या निमित्ताने मंदिरांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल म्हसावद जवळील पद्मालय तीर्थक्षेत्रावर अंगारकी चतुर्थी निमित्ताने राज्यभरातील भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या वर्षातील ही पहिलीच आणि शेवटची अंगारकी चतुर्थी असल्यामुळे दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. पद्मालय येथे एकाच व्यासपीठावर उजव्या आणि डाव्या सोंडेचे गणपती विराजमान आहेत. देशातल्या गणपतीच्या अडीच पीठांपैकी एक म्हणून पद्मालय येथील गणपतीची ओळख आहे. प्राचीन आणि जागृत देवस्थान असल्यामुळे दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांची पहाटेपासूनच मंदिरात गर्दी झाली आहे. देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांच्या लांब रांगा लागल्या पाहायला मिळाल्या

