गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर येथील रहिवासी असलेले उद्योगपती भावेश भाई भंडारी आणि त्यांची पत्नी यांनी सन्यांस घेतला आहे. भावेश यांनी आपली करोडोंची संपत्ती दान केली
त्यांनी ऐहिक आसक्ती सोडून त्यागाचा मार्ग स्वीकारला आहे. भावेश भाई भंडारी यांचा जन्म एका संपन्न कुटुंबात झाला. भावेश भाईं यांना 16 वर्षांचा मुलगा आणि 19 वर्षांच्या मुलीने दोन वर्षांपूर्वी शांत जीवन जगण्यासाठी दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. 2022 मध्ये मुलगा आणि मुलगी दिक्षा घेतल्यानंतर आता भावेश भाई आणि त्यांच्या पत्नीनेही संन्यासाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, भावेश भाई भंडारी यांनी सांसारिक आसक्ती सोडून 200 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता दान केली. त्यांनी अचानक अहमदाबादमधील बांधकाम व्यवसाय सोडून दीक्षाआरती करण्याचा निर्णय घेतला. भावेश यांचे परिचित दिलीप गांधी म्हणाले की, ”जैन धर्मात दीक्षाला खूप महत्त्व आहे. दीक्षा घेणाऱ्या व्यक्तीला भिक्षा मागून जीवन जगावे लागते. तसेच, एसी, पंखा, मोबाईल इत्यादींचा त्याग करावा लागतो. याशिवाय, संपूर्ण भारतभर अनवाणी प्रवास करावा लागतो.”
भिक्षुक बनणाऱ्या साबरकांठा जिल्ह्यातील भावेश भाई यांची हिम्मतनगरमध्ये मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांनी आपली सर्व मालमत्ता दान केली. 200 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता दान करण्यात आली आहे. ही मिरवणूक सुमारे चार किलोमीटर लांब होती.
परिचित दिकुल गांधी यांनी सांगितले की, 22 एप्रिल रोजी हिम्मतनगर रिव्हर फ्रंट येथे 35 जण एकत्र संन्यास घेणार आहेत. हिम्मतनगरच्या भंडारी कुटुंबाचाही यात सहभाग आहे. एवढेच म्हणता येईल की, कोट्यवधींची मालमत्ता सोडणाऱ्या व्यक्तीलाच संयमित जीवन जगण्याचा अधिकार आहे. कोट्यवधींची संपत्ती असलेले भंवरलाल जैन यांचा दीक्षार्थी होण्याचा निर्णय चर्चेत होता. त्यांनीही कोट्यवधींची मालमत्ता नाकारुन साधेपणाने जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता.