धरणगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन – सुरत भुसावळ लोहमार्गावर १८/०२/२४ रोजी २३:४० वाजता रे.स्टे.धरणगाव की.मी.275/19-21 मध्ये कोणत्यातरी धावत्या रेल्वेगाडीखाली सापडून,डोके फुटल्याने व हातापायाला कापल्या जावून अपघाती मृत्यू झाल्याची घटना सामोर आली आहे घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असता अनोळखी असण्याचे समजले याबाबत ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे. मयत व्यक्तीचे वर्णन केस-काळे,रंग-निमगोरा, दाढी,मिशी- काळी,पांढरी, बांधा-मध्यम,छातीवर जुने जळाले सारखे डाग ,तसेच उजव्या हातावर श्रीराम गोंधळले, अंगात निळसर चौकशीचा शर्ट ,निळ्या रंगाची लांब पँट असे वर्णनाचा या अनोळखी व्यक्तीचे ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून घटनेचा तपास पो.ना दिनकर कोळी करीत आहे. संपर्क 9823722516