जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन: जिल्ह्यातील चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील काही भागात सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह बेमोसमी पाऊस झाला. गणेशपूर येथे गारा पडल्या आहेत.
यामुळे मका, ज्वारी व बाजरी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. चाळीसगाव तालुक्यातील वरखेड, वाघडू, करगाव, अंधारी तसेच भडगाव तालुक्यातील जुवार्डी, आडळसे येथे वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह अर्धा तास जोरदार पाऊस झाला. यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.