• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

भक्ती संगीत संध्येतून भवरलाल जैन यांच्या गुणसंपदेचे प्रेरणादायी स्मरण

मोठ्याभाऊंच्या श्रद्धावंदन दिनानिमित्त अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण

policevrutta by policevrutta
February 26, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भक्ती संगीत संध्येतून भवरलाल जैन यांच्या गुणसंपदेचे प्रेरणादायी स्मरण मोठ्याभाऊंच्या श्रद्धावंदन दिनानिमित्त अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन,दि.२५ प्रतिनिधी – ‘कर्म हेचि जीवन’ मानणाऱ्या जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलाल जैन अर्थात मोठेभाऊ यांचा आज ता. २५ फेब्रुवारी श्रद्धावंदन दिन निमित्त अनुभूती निवासी स्कूलच्या वतीने ‘भक्ती संगीत संध्येतून मोठ्याभाऊंच्या गुणसंपदेचे प्रेरणादायी स्मरण करण्यात आले.

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या सहकार्यातून संजीवनी फाऊंडेशन व परिवर्तनतर्फे आयोजित सहा दिवसीय मैत्र महोत्सवाचा आज दुसरा दिवस होता. भाऊंच्या उद्यानातील एम्फी थिएटर मध्ये सुरू असलेल्या या महोत्सवात आज अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी गितार, तबला, बासरी, किबोर्डसह इतर वाद्यांच्या साथ संगतीने गायनातून दादाजींच्या जगण्याचे सार्थकत्व अधोरेखित केले.
याप्रसंगी प्रमूख अतिथी म्हणून अनुभूती स्कूलचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, सौ. ज्योती जैन, स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, डाॕ. भावना जैन, सुनिता भंडारी उपस्थित होते. महोत्सव प्रमुख अनिल कांकरिया, स्वरूप लूंकड, पारस राका, नारायण बाविस्कर उपस्थित होते. श्रध्देय भवरलाल जैन यांना श्रध्दांजली अर्पण करून स्वरानुभूतिची सुरवात झाली. सुत्रसंचालन अनुष्का महाजन, नमित जैन यांनी केले.

*तबला सोलोची जुगलबंदी*

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांसाठी दादाजींचं प्रेम मोठ्याभाऊंनी दिलं. त्याच आत्मियेतून अनुभूती निवासी स्कूल च्या विद्यार्थ्यांनी ‘भक्ती संगीत संध्या’ प्रस्तुत केले. तबला वादनामध्ये तीन ताल मध्ये उठान, कायदा, रेला, तुकडा, चक्रधर प्रस्तुत  केले. तिन ताल मध्ये ठाठ, आमद, टुकडे आणि लडी सादर केले. यानंतर तीन ताल मध्ये लखनौ घराण्याच्या  कथ्थक नृत्याने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. ‘हे राम अच्यूत्तम केशवा..’ ने आनंदाची अनुभूती करून दिली. मोठेभाऊंचे पाणी, माती यासह सृष्टीसंवर्धनाचे कार्याचे स्मरण करत,  विठु माऊली तु माऊली जगाची… राधा राणी लागे.. खेळ मांडला.. मोह लागे लगन.. वृक्षवल्ली आम्हां सोयरे.. मिठा क्रिष्णा नाम है.. अशी गीत गायली. औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित व भारतीय संस्कृतीची संस्कारमूल्यं रूजविणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलद्वारा संपन्न झालेल्या भक्ती संगीत संध्येला जळगावकरांनी भरभरून दाद दिली. तबला गुरू अमृतेश शांडिलय, गायन गुरू आकाश बिस्वाल, कथ्थक गुरू सोनम शांडिलय यांनी अनुभूतीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Previous Post

अमळनेर नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित रुख्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास अंतर्गत राज्यस्तरीय चर्चासत्र व्यवसाय मार्गदर्शन व रोजगार मेळावा संपन्न…

Next Post

ब्रेकिंग: जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट बेमोसमी पाऊस

policevrutta

policevrutta

Next Post
ब्रेकिंग: जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट बेमोसमी पाऊस

ब्रेकिंग: जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट बेमोसमी पाऊस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!