अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन – नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित रुख्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालय अमळनेर येथे व्यक्तिमत्त्व विकास अंतर्गत राज्यस्तरीय चर्चासत्र व्यवसाय मार्गदर्शन आणि रोजगार मेळावा संपन्न…
अमळनेर येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित रुख्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालय अमळनेर येथे व्यक्तिमत्त्व विकास अंतर्गत राज्यस्तरीय चर्चासत्र व्यवसाय मार्गदर्शन आणि रोजगार मेळावा संपन्न झाला. या चर्चासत्राचे आयोजन व्यक्तिमत्त्व विकास या विषया अंतर्गत तसेच नवीन शैक्षणिक धोरण 2020 या अनुषंगाने कमवा आणि शिका या संकल्पने तून शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने करण्यात आले. यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन, छंद किंवा कलेच्या माध्यमातून व्यवसाय निर्मिती, घरी बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसाय मार्गदर्शन इ विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञ, यशस्वी मंडळीनी मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात कार्यक्रमाची सुरुवात ईश स्तवनाने करण्यात आली. ईश स्तवन श्रीमती नैना कुलकर्णी यांनी सादर केले. सर्वात प्रथम महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी श्री डी बी पाटील यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत आपले आई वडील आपले गुरू यांच्या कडून आपल्यावर संस्कार होत असतात आणि त्या वरच आपण यशस्वी वाटचाल करत असतो असे सांगत स्व अनुभव विद्यार्थिनींना सांगितले.यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्ही ए पवार, संचालक, पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अमळनेर, यांनी विद्यार्थिनींशी स्पर्धा परीक्षा, त्यांचे स्वरूप, अभ्यास तंत्र, यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा इ च्या माध्यमातून मार्गदर्शन केले. सौ आरती रेजा संचालिका सखी कलेक्शन यांनी गृहिणी ते बिझिनेस वूमन हा प्रवास उलगडत परक्या राज्यातून आलेल्या एका स्त्रीला उच्च शिक्षित असूनही भाषे ची समस्या आणि इतर समस्या मुळे व्यावसायात फक्त दहा हजार रु गुंतवणूक करून सुरुवात करत मोठ्या व्यवसायात झालेले रूपांतर स्पष्ट केले. सौ. शितल सावंत, संचालिका ओम साई बेकरी, नारी फॅशन बुटिक यांनी 11 वर्ष शिक्षक, प्रा म्हणून कार्य केल्या नंतर व्यवसायात येणे पसंद केले. आज शहरात प्रथम महिला व्यापारी संघटना निर्माण झाली असून महिलांनी व्यवसाया कडे सकारात्मक दृष्टीने पाहणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. तर सौ प्रिया रजाळे, संचालिका आरुज हर्बल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घरी बसून आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम होवू शकतो. सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर चांगला बिजेनेस घेवून जागतिक पातळीवर आपला व्यवसाय पोहचवू शकतो असे मत व्यक्त केले. सर्वात तरुण बिझिनेस गर्ल कू मानसी झाबक संचालिका, द युनिक आर्ट हिने आपण फॅशन डिझायनर असून पुणे येथे नोकरीला असल्या वरही कुठे तरी कमतरता जाणवली म्हणून नोकरी सोडून व्यवसाया कडे वळली असे मत व्यक्त केले. सुजाण साडी सेंटर चे सर्वेसर्वा श्री रमेश जीवनानी यांनी आपल्या मनोगतात आम्हाला नेहमीच दुकानात कामासाठी महिला ,मुली यांची आवश्यकता असते. त्यानुसार ज्या ज्या विद्यार्थिनींना गरज असेल अश्यानी संपर्क साधावा आम्ही मुलाखती घेऊन योग्य त्या उमेदवारास निच्छित रोजगार मिळविण्यासाठी नोकरी देवू असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात रोजगार मेळाव्यात श्री. सुधीर सोनवणे ( पारस गोल्ड), श्री रमेश जिवणानी (सुजाण साडी सेंटर), दिपक वच्छानी (सुदाम क्लॉथ), मुकेश किशोर लुल्ला (श्याम जनरल स्टोअर) यांनी स्टॉल लावून विद्यार्थिनींचे नोकरी साठी अर्ज भरून घेवून त्यांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी विद्यार्थिनींनी आपले पासपोर्ट फोटो सह आधारकार्ड जोडून माहिती रिज्युम फॉर्म मध्ये भरून दिली. जवळ जवळ 80 विद्यार्थिनीनी सदर फॉर्म भरून देवून रोजगाराच्या दिशेने पहिले पावूल उचलले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस जे शेख हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थिनीनी शिक्षणा बरोबरच आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे ही काळाची गरज आहे. तसेच महाविद्यालय विविध उपक्रमांचे आयोजन करत असते त्यात विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवावा असे मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक प्रा जयश्री साळुंके- दाभाडे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन/ प्रास्ताविक देखील प्रा साळुंके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा डॉ सरिकाबेन पाटील यांनी केला तर आभार प्रदर्शन कू श्रद्धा देखमुख या FYBA च्या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
प्रसिद्ध रांगोळीकार श्री नितीन भदाणे यांचे विशेष सहकार्य लाभले.