जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन: उमाळा ग्रामपंचायतीचे बनावट पावती पुस्तक तयार करून वसूल केलेल्या पाणीपट्टीच्या पाच लाख ५८ हजार ५०६ रुपयांचा बँकेत शासकीय भरणा न करता त्याचा अपहार करण्यात आला. याप्रकरणी संदीप चंद्रभान निकम या ग्रामसेवकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप चंद्रभान निकम याच्याकडे १३ मार्च ते ३ जुलै २०२३ या दरम्यान उमाळा ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक पदाचा पदभार होता. त्या दरम्यान त्याने अस्सल पावती पुस्तकाद्वारे पाणी पुरवठा वसुलीचे ६०० रुपये

ग्रामनिधीमधील चार लाख १४ हजार ४०० रुपये तसेच बनावट पावर्त पुस्तक वापरुन एक लाख ४३ हजार ५०६ रुपये असे एकूण पाच लाख ५८ हजार ५०६ रुपये वसूल केले होते. मात्र ती रक्कम त्याने शासकीय भरणामध्य न भरता स्वत:च्या फायद्यासाठ वापरली. या प्रकरणी तत्कालीन सरपंच संगीता खडसे व कर भरणाऱ्या सवित चौधरी यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकार अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती त्यानुसार चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांच्य आदेशानुसार पंचायत समितीच् विस्तार अधिकारी राजेश इंगळे यांन एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संदीप निकम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

