अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन – शहरातील केले नगर भागातील ऋवेद प्रमोद पाटील (वय २०) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून अमळनेर पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील केले नगर भागात प्रमोद विठ्ठल पाटील व वंदना प्रमोद पाटील हे शिक्षक दाम्पत्य राहते. दोघेही हिंगोणे सिम जि.प.शाळेत शिक्षक आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा ऋवेद हा बारावीची परीक्षा पास होऊन, नीटच्या परीक्षेचा अभ्यास करत होता.
१५ रोजी तो एकटाच घरी असतांना दुपारी २.३० वाजेच्या सुमारास मयूर बेहरे याने ऋवेदला आवाज दिला असता कुठलाही प्रतिसाद न दिल्याने तसेच त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता ऋवेदने लाकडी ग्रीलच्या साहाय्याने लटकवून घेत गळफास घेतलेला आढळून आला. उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चूलत भाऊ मयूर बेहरे याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

