प्रेमप्रकरणामुळे चर्चेत असलेली सीमा हैदर आता पुन्हा चर्चेत आली आहे. पाकिस्तानातून नेपाळमध्ये (Nepal) आणि नंतर भारतात आपल्या मुलांसह आलेली सीमा हैदरबाबत आणखी एक बाब समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये सीमा हैदर प्रचारकाची भूमिका निभावणार आहे.
मूळ पाकिस्तानच्या असणाऱ्या सीमा हैदर ही निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा यापूर्वी होत होती. काही पक्षांनी देखील तिला ऑफर दिल्या होत्या. आता मात्र निवडणूकांसाठी ती प्रचार करणार असल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा देखील सीमा हैदर हिने प्रचार केला होता. भगव्या वस्त्रांमध्ये प्रभू रामांचे जयघोष करताना सीमा हैदर दिसून आली होती. यापुढे ती लोकसभेचा प्रचार करताना दिसणार आहे.
आगामी लोकसभेचे वारे देशभरामध्ये वाहत असताना ‘राष्ट्रीय लोक दल’ने (RLD) अनोखा प्रचार योजिला आहे. एका वाहिनीने दिलेल्या रिपोर्टनुसार, लोकसभा निवडणूकीमध्ये मथुरामध्ये जिंकण्यासाठी रालोदने हटके विचार केला आहे. सीमा हैदर त्यांच्या पक्षाचा प्रचार करताना दिसण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सीमा हैदर हिची रालोदच्या नेत्यांनी भेट देखील घेतली आहे. पाकिस्तानमधून भारतामध्ये दाखल झालेल्या सीमा हैदर हिलाच निवडणूकीमध्ये प्रचारासाठी उतरवण्याच्या तयारीमध्ये ‘राष्ट्रीय लोक दल’ दिसत आहे.