धरणगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन: (प्रतिनिधी: विनोद रोकडे) श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट द्वारा आयोजित एक्युप्रेशर,सुजोक,वायब्रेशन,नेचरल थेरेपी चिकित्सा शिबिराचा समारोप करण्यात आला. दि.३ फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी पर्यंत हे शिबिर. श्री आ.दि.जैन मंदिर हॉल मध्ये करण्यात आले. सदर शिबीरास जोधपूर येथील तज्ञ डॉक्टर गुरुप्रीतसिंग,मुकेश चौधरी व सौरभ पटेल यांनी अतिशय सुंदर अशी सेवा दिली. त्यानिमित्ताने डॉक्टरांना प्रशस्तीपत्र श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट तर्फे प्रा.ए.एम.जैन सर तसेच संजय महाजन यांच्या सोबत देण्यात आले.
या शिबिरात अनेक जेष्ठ मंडळींनी सहभाग नोंदविला,व खास करून महिला मंडळी जास्त प्रमाणात होत्या. अनेक रुग्णांना 3/4 दिवसात खूप आराम भेटला,व अनेक महिला खूप समाधानी झाल्या असून असे शिबीर दर 4/5 महिन्यात एकदा झाले पाहिजे,असे अभिप्राय दिलेत.या शिबिरात जेष्ठ डॉ.व्ही.आर.तिवारी, सौ.तिवारी काकी,संजय महाजन,धिरेंद्र पुरभे,पुनीलाल महाजन,जीभाऊ महाजन,राजेंद्र पाटील,नीरज तिवारी,स्वाती देसले,जितेंद्र परदेशी,ब्र.नीता दीदी,ब्र.सरिता दीदी,रमेश कोल्हे,कमलेश तिवारी,विनोद रोकडे,संजीव जैन,सुभाष जैन,सीताराम मराठे,भगीरथ माळी,धर्मराज मोरे अश्या गावातील अनेकांनी शिबिरात सहभाग घेतला व खूप समाधानी झाले.
अनेक रुग्ण जळगाव, साकरे, वंजारी,पष्टाने,सोनवद,येथून आलेले होते. सदर शिबिरात जवळपास 300 रुग्णांनी आपले उपचार करून घेतले.
ह्या शिबिराचे आयोजन अतिशय उत्कृष्टपणे व नियोजनबद्ध व शिस्तीत करण्यात आलेले होते.
ह्या शिबिरासाठी यशस्वी करण्यासाठी श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष राहुल जैन, उपाध्यक्ष प्रतीक जैन, सचिव श्रेयान्स जैन, सदस्य निकेत जैन,सावन जैन,सुयश डहाळे, मयंक जैन ,विलास जैन यांचे अनमोल सहकार्य लाभले.