अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन: शहरापासून दीड किमी अंतरावर गलवाडे रस्त्यावर चारीत दुचाकी उलटून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना 7 रोजी सकाळी उघडकीस आहे.
मयत प्रवीण नाना पाटील रा. खर्दे ता. अमळनेर (ह.मु. तांबेपुरा) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव असून दिनांक 6 रोजी रात्री 9:30 ते दिनांक 7 च्या सकाळी 7 वाजेच्या दरम्यान ते आपल्या दुचाकीवरून खर्देकडून अमळनेर येथे येत असताना शहरापासून दीड किमी अंतरावर रस्त्याच्या कडेला खोल चारीत दुचाकी उलटल्याने गंभीर जखमी होवून पडले होते. घटना लक्षात आल्यावर त्यांना दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी मारवड पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.