जळगाव : पोलीस वृत्त ऑनलाईन: फेसबुक Facebook किंवा व्हाट्सॲपवर WhatsApp अनोळखी व्हीडीओ कॉल Video Call येतोय? तर सावध व्हा. हा कॉल कोणत्याही परिस्थितीत घेऊ नका, नाही तर ‘सेक्सटॉर्शन’ला Sextortion बळी पडाल या बाबत असाच एक प्रकार जळगावातून सामोर आला आहे. व्यापाऱ्याला अनोळखी महिलेचा व्हिडीओ कॉल घेणे चांगलाच महागात पडला आहे. महिलेने व्हिडीओ कॉल करून एका व्यापाऱ्याचा नग्न व्हिडिओ शुट केला.
त्यांनतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून तो डिलीट कारण्याच्या नावाखाली तब्बल ४३ लाख ३ हजार ४९० रुपयांची खंडणी उकळली. एवढी रक्कम देऊनही वारंवार धमकी दिली जात असल्याने अखेर व्यापाऱ्याने याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यापारी असलेले केशव महादेव पोळ (वय-६५, रा. छत्रपती शिवाजीनगर, जळगाव) यांना २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पूजा शर्मा, संजय माथूर, राहुल शर्मा असे नाव सांगणाऱ्यांनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून मेसेज केले. तसेच व्हिडिओ कॉल करून अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाले असून ते डिलिट करायचे असतील तर पैसे द्या अन्यथा तुमच्या घरी पोलिस पाठवून तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी धमकी दिली.
यात व्यापारी पोळ हे घबरल्याने त्यांच्याकडून वेळोवेळी तब्बल ४३ लाख तीन हजार ४९० रुपये खंडणीच्या स्वरुपात वेगवेगळ्या बँक खात्यावर स्वीकारले. एवढी रक्कम देऊनही वारंवार धमकी दिली जात असल्याने केशव पोळ यांनी रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संजय माथूर, राहुल शर्मा असे नाव सांगणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील करत आहेत.