नंदूरबार: आठ वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या चुलत काकाला न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला.
आठ वर्षीय बालिका घरात एकटी होती. तिची आई शेतात गेल्याचे पाहून चुलत काकाने बालिकेवर लैंगिक अत्याचार केले. आईने विसरवाडी पोलिसात संशयिताविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून पोस्कोअंतर्गत वर्षभरापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता
विसरवाडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहा. पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भूषण बैसाणे यांनी तपास केला. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने सर्व बाबी व साक्षी-पुरावे तपासून संशयित आरोपीस दोषी ठरवत १० वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाच्या वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड. बी.यू. पाटील यांनी काम यांनी पाहिले..