अमळनेर : पोलीस वृत्त ऑनलाईन तालुक्यात एक फसवणुकीचा खळबळजनक प्रकार सामोर आला आहे. एका शेतकऱ्याच्या खात्यातील १ लाख रुपये गायब करत दुसऱ्या खात्यात वळवून फसवणूक केल्याच्या प्रकार तालुक्यातील कलाली येथील शेकऱ्याच्या बाबतीत घडली. या बाबत मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कलाली येथील शेतकरी शरद पाटील यांचे निंभोरा येथील बँक ऑफ बडोदा शाखेत बचत खाते असून दिनांक ३० रोजी सायंकाळी ५:३० वाजता त्यांच्या खात्यातून ९९,९९९ रुपये ट्रान्स्फर झाल्याचा मेसेज मोबाईलवर प्राप्त झाला. त्यांनी बँकेत तपास केला असता सदर रक्कम त्यांच्या खात्यातून नाशिक येथील डी. बी. एस बँकेच्या अज्ञात इसमाच्या खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे आढळून आले. त्यावरून त्यांनी पोलीसात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावरून मारवड पोलीसात माहिती तंत्रज्ञान कलम ६६ सी व ड, भादवि कलम ४२० अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


