अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन येथील अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवार, दि.२ रोजी होत आहे. या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे उपस्थित राहणार आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शासकीय दौरा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे. शासकीय दौऱ्यानुसार शुक्रवारी दि.२ रोजी सकाळी सहा वाजता देवगिरी येथून छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळ येथून ६ वाजून ३० मिनीटांनी प्रयाण करतील. नाशिक येथील ओझर विमानतळावर ७ वाजून १० मिनीटाला आगमन तर सव्वासात वाजता हेलिकॉप्टरने अमळनेरकडे प्रयाण करतील. आठ वाजून पाच मिनीटांनी अमळनेर येथील क्रीडा संकुल हॅलिपॅड येथे आगमन होईल. त्यानंतर अमळनेर तालुका क्रीडा व संकुलाचे उर्वरित बांधकामांचे भुमीपूजन करतील. त्यानंतर नऊ वाजता अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील निन्म तापी प्रकल्पाला भेट देतील.