यावल (प्रतिनिधी: पोलीस वृत्त ऑनलाईन) दुसखेडा ता.यावल येथील ग्रामपंचायत सरपंच सौ लक्ष्मीबाई सोनवणे यांनी २६ जानेवारी प्रजाकसत्ताक दिनी ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रथम महिला पोलीस पाटील सौ. संगिता विशाल दांडगे यांना ध्वजारोहण करण्याचा बहुमान दिला.प्रथमच गावाला महिला पोलीस पाटील हे पद मिळाल्या मुळे हा बहुमान पोलीस पाटील संगिता दांडगे यांना सरपंच यांनी दिला.यावेळी ग्रामपंचायत सदस्या चंद्रभागा दांडगे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विनोद तायडे, उपशिक्षक प्रशांत पाटील,नितीन चौधरी, डी आर सोनवणे, कैलास चौधरी, ह.भ.प.राजेंद्र महाराज दांडगे अंगणवाडी सेविका मुक्ताबाई सोनवणे, छायाबाई सोनवणे, अंगणवाडी मदतनीस सिंधुबाई पाटील, मंगलाबाई पवार,आरोग्य सेवक सतीश पवार, आरोग्य सेविका मनीषा जाधव, आरोग्य मदतनीस लता सोनवणे, आशावर्कर रेखा सोनवणे, सुनीता सपकाळे पशु सखी सुनिता सपकाळे, तेजस्विनी सोनवणे ग्रामपंचायतचे ऑपरेटर कैलास तायडे ग्रामपंचायत कर्मचारी संदीप सोनवणे, शंकर पाटील वायरमन चेतन पाटील सामाजिक कार्यकर्ते योगेश सोनवणे, दिनू महाराज वसु टेलर शांताराम चौधरी, यशवंत सोनवणे, सुनील बोंडे, दिव्यांग सेनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विशाल दांडगे शिवाजी महाराज व मराठी शाळेतील विद्यार्थी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते


