अकोला: पोलीस वृत्त ऑनलाईन: एका तुरीच्या दाण्याने चिमुकल्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुरीचा दाणा नकात अडकल्याने श्वासोश्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्याने एका तीन वर्षीय चिमुकल्याचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाटसुल या गावात २३ जानेवारी रोजी रात्री घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरून एकही चूल पेटली नाही.
या बाबत माहिती अशी की २३ जानेवारी रोजी आठच्या सुमारास घरात आजी तुरीचे दाने काढत असताना त्यांचा नातू योगिराज अमोल ईसापुरे (yogiraj Amol ashapuri) (३) हा आजीजवळ आला. आजीने काढून ठेवलेल्या तुरीचे दाने त्या चिमुकल्याने मुठीत घेतले. आणि तोंडात ओतले. त्यातील एक दाना मुलाच्या नाकात गेला. त्याला लगेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तो तडफडत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्याचा प्रयत्न केला;परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली.