जळगाव पोलीस वृत्त ऑनलाईन– धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावाजवळील मुसळी फाट्यावर मंगळवारी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता स्पीडब्रेकरमुळे दुचाकीचा तोल गेल्याने झालेल्या अपघातात महिलेच्या डोक्याला जबर मार लागला होता.त्यांच्यावर उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्याची बुधवारी २४ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता सुमारास घडली आहे. धनश्री गोपीचंद पाटील (वय २८, रा. असोदा ता. जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धनश्री पाटील(dhanashri Patil) या महिला आपले पती गोपीचंद (Gopichand), दोन मुले, सासू-सासरे यांच्यासह जळगाव तालुक्यातील आसोदा येथे राहत होत्या. पती गोपीचंद हे फर्निचर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही कामानिमित्त गोपीचंद पाटील हे आपल्या पत्नीसोबत मंगळवारी २३ जानेवारी रोजी रोजी सकाळी धुळे येथे गेले होते. तेथून परतत असताना सायंकाळी ७ वाजता धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावाजवळील मुसळी फाट्याजवळून जात असतांना रस्त्यात अचानक स्पीडब्रेकर आल्याने ब्रेक लावल्यावर वाहनावरून दोघे खाली पडल्यावर धनश्री पाटील ह्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. यात त्या जबर जखमी झाल्या. त्यांना जळगावात खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना बुधवारी २४ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली


