अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन – शहरातील अमलेस्वर नगर येथून धक्कादायक घटना समोर आले आहे पत्नीला दारू पिऊन मारहाण करीत असल्याने पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या करीत जीवन संपविले आहे घटना २४ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घटना घडली असुन याप्रकरणी पतीसह सासू व लहान दिर अशा तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील अमलेश्वर नगर भागात रविता लोकेश महाजन या महिलेने स्वतःच्या राहत्या घरात २४ रोजी पहाटे ३ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी भेट दिली. मयताचे शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मुलीचे वडील रवींद्र सुरेश वळवी (वय ४० रा. तळोदा जि. नंदुरबार) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोकेश उर्फ लकी भास्कर महाजन हा नेहमी दारू पिऊन रविताला मारहाण करीत होता. २३ रोजी रात्री ८ वाजता त्याने मारहाण केली. तसेच भुकेले ठेवले. सासू कांताबाई महाजन लोकेशला चिथावणी देत होती व दिर बब्बू भास्कर महाजन हा देखील मारण्यास चिथावणी देत असे. म्हणून अमळनेर पोलिस स्टेशनला पती, सासू, दिर तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख करीत आहेत.

