राज्यव्यापी महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांची खंत
मनवेल ता.यावल (प्रतिनिधी):- भारतासह अख्ख्ये जग ज्या क्षणांची वाट पाहत होते त्या श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठा नुकतीच श्रीक्षेत्र अयोध्या पुण्यनगरीत झाली. अयोध्या पुण्यनगरीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला म.वाल्मिकी ऋषींचे नावही देण्यात आले. हि आदिवासी कोळी जमातीच्या लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारतभर जागोजागी संगीत रामायणाच्या कथा सुरू आहेत.जे रामायण म.वाल्मिकींनी लिहीलेले आहे. ते म.वाल्मिकीं ऋषी खान्देशातील चाळीसगाव येथील वालझरी गावातील आदिवासी कोळी जमातीचे होते. परंतु अजुनही आदिवासी कोळी जमातीच्या लोकांना त्यांच्या संविधानिक न्याय व हक्कांसाठी लढावे लागत आहे. राज्यभर महाआंदोलन अन्नत्याग सत्याग्रह, ठिय्या आंदोलन, साखळी उपोषण, रास्तारोको, ठिय्या धरणे आंदोलन करावे लागत आहे. तरिही शासन प्रशासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. जोपर्यंत ह्या लोकांना अनुसूचित जमातीचे जात व वैधता प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत हा लढा दिवसेंदिवस तीव्र होणार आहे.जळगावात अशाचप्रकारे जी.एस.ग्राऊंडवर एकीकडे श्रीरामभक्तांसाठी कथा सुरू आहे तर त्याच ठिकाणी दुसरीकडे म.वाल्मिकी ऋषींच्या वंशजांची व्यथा (उपोषण) सुरू आहे. अशी खंत आदिवासी कोळी जमातीच्या राज्यव्यापी महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर चोपडा यांनी व्यक्त केली आहे.
उपोषणस्थळी उपोषणकर्ते पुंडलिक सोनवणे भोकर, पद्माकर कोळी डोंगरकठोरा यांचेसह समाजसेवक लखिचंद बाविस्कर, मुकेश सोनवणे, प्रा.भाऊसाहेब सोनवणे, सौ.मंगला सोनवणे, डॉ.कमलाकर पाटिल, डॉ. गोकुळ बिर्हाडे, एडव्होकेट गणेश सोनवणे, कैलास सपकाळे, आंताराम नन्नवरे, अनिल कोळी, भरत सपकाळे, रतन महाराज, युगांत कोळी, शांताराम नागरूत, किशन भोलाणे, विजय भोलाणे, धनराज सोनवणे, प्रदीप कोळी, बाबुराव सपकाळे, अण्णा सूर्यवंशी, अरुण सोनवणे, राजेंद्र जाधव, चंद्रकांत कोळी, श्रावण कोळी, सुरेश रायसिंग, भोलेनाथ काकडे, माधवराव काकडे, रवींद्र काकडे, सिताराम जाधव, गणेश कोळी, गोपाल कोळी, वाल्मीक कोळी, जिभाऊ काकडे, माधव मोरे, विशाल कोळी, कैलास मोमे, भाऊसाहेब कोळी, ज्ञानेश्वर कोळी, कृष्णा काकडे, रोहिदास सोनवणे, गणेश चव्हाण, दीपक काकडे, धनराज काकडे, दत्तू कोळी, गोकुळ कोळी, रोहित इंगळे, सुक्राम सोळुंखे, श्रीक्रिष्ण सुरडकर, आकाश सुरडकर, चेतन सुरडकर, सुरेश जाधव, राजू सुरळकर, सचिन पवार, अरुण कोळी यांची उपस्थिती होती.