मुंबई: पोलीस वृत्त ऑनलाईन- सध्या प्रेम प्रकरणाच्या घटना वाढत चालल्या असुन यातच आणखी एक घटना सामोर आली आहे. मुंबईतील तळोजा जेल परिसरात एका 19 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला होता. एक महिन्यापूर्वी कॉलेजला सांगून घराबाहेर पडलेली मुलगी परतलीच नाही. अखेर तिचा मृतदेह मिळून आल्याने कुटुंबियांना धक्का बसला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. आत्महत्या की घातपात हा प्रश्न शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सुटला. हत्येचा गुन्हा दाखल करुन पोलीस तपास सुरू झाला. यात जे समोर आलं त्याची पुसटशीही कल्पाना मृत मुलीच्या कुटुंबियांना नव्हती.

ब्रेकअप केल्याने तरुणीची हत्या
वैष्णवी बाबर असं 19 वर्षीय मृत तरुणीचं नाव आहे. वैष्णवी बाबर या तरुणीचे मागील चार ते पाच वर्षापासून वैभव बुरगले या मुलासोबत प्रेम संबंध होते. मात्र, तिने हे प्रेम प्रकरण पुढे सुरू ठेवण्यास नकार दिला. प्रेयसीने ब्रेकअप केल्याने तरुणा राग अनावर झाला. यातूनच प्रेयसीला कायमचं संपवण्याचा कट त्याने रचला. आरोपी तरुणाने एका साथीदारासोबत तरुणीची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह नवी मुंबईतील तळोजा जेल परिसरात आणून टाकला. जवळपास एक महिना मृतदेह तसाच राहिल्याने कुजला होता.
प्रेयसीच्या हत्येनंतर मुलानेही संपवलं जीवन
प्रेयसीची हत्या केल्यानंतर तरुणानेही रेल्वेमधून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मुलाने एक चिठ्ठी लिहली असून त्या चिठ्ठीत आपणच मुलीला मारले असून आम्ही पुढच्या जन्मी पुन्हा भेटू असे लिहून आपणही आत्महत्या करत असल्याचे यात नमूद केले. यासाठी कुणालाही जबाबदार धरले जाऊ नये असे नमूद केल्याचे समोर येत आहे. मुलीचा मृतदेह तळोजा जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत सापडल्याने नवी मुंबईत एकच खळबळ उडाली होती. याबाबत अधिक माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

