चाळीसगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन: पंडित प्रदिप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन येत्या १६ तारखेपासून शहरातील मालेगाव रोड परिसरात करण्यात आल्याची माहिती असून यामुळे भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पंडित प्रदिप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरील आशिष हॉटेल जवळ येत्या १६ जानेवारी रोजी पासून करण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या माध्यमातून ही कथा भरविण्यात आले असून १६ ते २१ जानेवारी दरम्यान कथा पार पडणार आहे.
या कालावधीत दररोज दुपारी ३ ते ५ यावेळी पंडित प्रदिप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा ऐकता येणार आहे. तत्पूर्वी कार्यक्रमाला अवघे सात दिवस बाकी आहे. परंतु तालुक्यासह आजूबाजूचे तालुक्यातील भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
चाळीसगावात पंडित प्रदीप मिश्रा येणार असल्याचे निश्चीत झाल्याचे मानले जात आहे.

