जळगाव: (प्रतिनिधी). ०७ जानेवारी २०२४ l येथील रिफॉर्मेशन आणि सैफअली व जीशान सौदागरसह टीम तर्फे नुकत्याच नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या व्हॉलीबॉल स्पर्धेत अल अकसाला विजेतेपद तर वाजिद फाउंडेशनला उप विजेतेपद प्राप्त झाले. या स्पर्धेत सहा संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. यात उस्मान ए गाझी, स्पोर्ट्स हाऊस, इकरा, रुस्तम फिटनेस, अल अकसा, वाजिद फाऊंडेशन सांघानी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन इकरा संस्थेचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार यांच्या हसते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुल अजीज सालार होते.
यात फायनलमध्ये अल अकसा संघाने वाजिद फाउंडेशनवर मात करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. यावेळी आयोजक रिफॉरमेशन टीम आणि सैफअली यांच्या हसते विजेत्या आणि उप विजेत्या संघाला रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.