जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन– दि.08/01/2024 रोजी 23:15 वा. पुर्वी रेल्वे स्टेशन जळगाव किमी. 305/04 जवळ ट्रेन नं 19106 अप भुसावळ उधना मेमो समोर येवून डोक्याला जबार मार लागुन नाकातुन व तोंडातून अति रक्तस्त्राव होवून जबर जख्मी झाल्याने त्यास 108 अॅम्बुलन्सने ओषधोउपचार कामी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्नालय जळगाव येथे नेले असता ऑन ड्युटी मा. सि.एम.ओ. यांनी तपासून मृत घोषीत केले आहे. बाबत ऑन ड्युटी डी. वाय.एस.एस.श्री आर. के. पारलेचा साो. यांनी दिलेल्या लेखी मेंमो वरून इकडील पोस्टेला वरील प्रमाणे मार्ग दाखल करून तपासावर घेण्यात आला आहे.
मयत इसमा चे वर्णन खालील प्रमाणे
वय अंदाजे 35 वर्षे, उंची 5 फुट 5 इंच, रंग सावळा, शरीर बांधा सळपातळ, केस काळे दाढी मिशी बारीक काळी, चेहरा लांबट, अंगात पांढ-ये व ग्रिन रंगाची बारीक लाईनींग चे चौकडीचे फुलबाहीचे शर्ट, काळ्या रंगाची पँट तसेच शरीरावर ओळख चिन्न
उजव्या हाथावर मॉ, बाबा व बदामाचे चिन्न गोंधलेले आहे. डाव्या हाथावर नक्शी गोंधलेली दिसत आहे. या बाबत ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे पुढील तपास अंमलदार पो.ना हिरालाल चौधरी करीत आहे

