जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन: जळगाव जिल्ह्यातील अनेक काही महिन्यापासून अल्पवयीन मुलीसह, तरूणी,विवाहितेवर विनयभंग व अत्याचार केल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना नुकतेच धरणगाव तालुक्यात देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २६ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी एका विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील एका परिसरात २६ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास असून गेल्या जून २०२३ ते १६ डिसेंबर २०२३ या दरम्यान गावातील एका तरुणाने विवाहीतेचा अंघोळ करताना बाथरूम मधील व्हिडीओ काढून तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी तर विवाहितेच्या मुलाला उचलून नेण्याची व नवऱ्याला मारून टाकण्याची धमकी देवून फिर्यादीच्या घरात घुसून तीन ते चार वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून धरणगाव शहर पोलिसात एका तरूणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहेत.