व्हायरल पत्र फेक असल्याचा दावा
मुंबई : महाराष्ट्रामध्ये महिला पोलीसच सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाबा समोर आली आहे.
पोलीस दलातील महिलांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र पाठवत त्यांच्यावर होत असलेले अत्याचार समोर आणले आहेत. मुंबईतील 8 महिला पोलीसांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहित पोलीस अधिकारी त्यांच्यावर बलात्कार (Rape On Women Police) व अत्याचार करत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. या लेटरबॉंम्बमुळे पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईच्या नागपाडामधील मुंबई पोलीस दलाच्या ट्रान्सफर डिपार्टमेंटमधील आठ महिला पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र लिहिलं आहे. यामध्ये एक पोलीस उपायुक्त, दोन पोलीस निरिक्षक आणि आणखी एका अधिकाऱ्यावर या महिला पोलिसांनी गंभीर आरोप केले आहेत. तुम्हाला कमी काम लावतो, असे अमिष दाखवून महिला पोलीसांचं शोषण केलं जातं असल्याची गंभीर बाब या पत्रामध्ये मांडण्यात आली आहे. पोलिसांच्या सरकारी निवासस्थानी नेऊन या महिला पोलिसांवर अत्याचार केला गेल्याची माहिती आहे.
ते पत्र बनावट?
या प्रकरणी अपडेट आली असून, या प्रकरणी पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मुंबई पोलीस आयुक्तांना हे पत्र पाठवण्यात आले असून, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशीला सुरुवात केली असता, या महिला पोलीस शिपायांच्या नावाचा गैरवापर करून हे बनावट पत्र पाठवण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, हे खरे असल्यास ते पत्र नेमकं कोणी पाठवलं आणि त्यामागे नेमका उद्देश काय याची चौकशी सूरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले जात आहे. दरम्यान, जे पत्र माध्यमांमध्ये आलं आहे, ते पत्र बनावट असल्याचा दावा आता करण्यात येत आहे. अशी कोणतीही घटना घडलेली नाही, जी घटना माध्यमांमध्ये आली आहे, ती चुकीची आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
काय म्हटले पोलीस