जळगाव : पोलीस वृत्त ऑनलाईन– जळगाव शहरातून धक्कादायक घटना सामोर आली आहे. भीक मागून उदरनिर्वाह करणार्या अल्पवयीन १३ वर्षीय चिमुकलीवर शेतात जाऊन अत्याचार करणाऱ्या नाराधम आरोपीच्या शनिपेठ पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. वसीम खान कय्युब खान (25, रा.पटेलवाडा, ममुराबाद, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे .
या बाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात 12 वर्षीय पीडीता आपल्या कुटुंबियांसोबत राहत असून हि चिमुकली ही गतीमंद असल्याने तिच्या आत्यासोबत भीक मागून उदरनिर्वाह करते. शुक्रवार, 5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पीडीता सुभाष चौक परिसरात भिक मागत असतांना संशयित आरोपी वसीम खान कय्युब खान (25, पटेलवाडा, ममुराबाद, जळगाव) याने पीडीतेला दुचाकी (एम.एच.19 ई.एच.5431) वर बसवून जळगाव-भुसावळ महामार्गावरील दुरदर्शन टॉवरजवळील एका शेतात नेत तिथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर परत दुचाकीवर बसवून पीडीतेला सुभाष चौकात सोडून दिले. हा प्रकार घडल्यानंतर पीडीतेने आत्या आणि नातेवाईकांना माहिती दिल्यावर शनिपेठ पोलिसांनी सूत्रे हलवून वसीम खान याला ताब्यात घेतले . ही मुलगी गायब झाल्याने सुरुवातीला या मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होता. त्यात नंतर अत्याचार, पोस्को कायद्यान्वये कलम वाढविण्यात येऊन वसीम खान अय्युब खान याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली व खान याला रविवार, ७ जानेवारी रोजी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्या. जे.जे.मोहिते यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.