अमळनेर : पोलीस वृत्त ऑनलाईन: तालुक्यातील कावपिंप्री येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे २० वर्षीय तरुण धनंजय गुलाबराव पाटील याने दि .१२ रोजी दुपारी २ वाजता स्वतःच्या राहत्या घरी छताला सुताची दोरी बांधून आत्महत्या केली.
धनंजय हा गुजरात येथे सेलवासाला कंपनीत नोकरीला होता. दोन दिवसांपूर्वी तो गावी आला होता. महेश सुपडू पाटील याने खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत


