पारोळा: पोलीस वृत्त ऑनलाईन– लोकप्रतिनिधी यांनी आदिवासी समाजाचे किरकोळ प्रश्न सोडवत किंवा आदिवासी बांधवांचा सत्कार करून तात्पुरते समाधान करण्यापेक्षा आदिवासी महापुरुष एकलव्य यांचे स्मारक बांधावे अशी मागणी आदिवासी सुरक्षारक्षक गृपचे संस्थापक रवींद्र वाघ यांनी केली आहे.
आज तालुक्यात आदिवासी भिल्ल समाज हा हजाराहून जास्त लोकसंख्येचा प्रमाणात आहे.परंतु आदिवासी समाज बांधव आज देखील अनेक सुविधांपासून वंचित आहे.तसेच राजकीय क्षेत्रात देखील समाजातील अनेक लोकांना डावलेले जाते.
त्यांची नेहमी वरच्यावर बोडवण केली जाते. आज समाज जीवनात भिल्ल आदिवासी समाजाचे महापुरुष एकलव्य यांचे देखील महत्त्व आहे.आदिवासी समाजातील प्रत्येक युवक वर्गाला हाताला काम मिळावे. समाजाविषयी असलेला वैर भाव दूर व्हावा यासाठी लोकप्रतिनिधी यांनी आदिवासी समाजाचा युवकांना देखील पुढे आणण्यासाठी मदत करावी. जेणेकरून उपेक्षित असलेला आदिवासी समाज याला न्याय मिळेल.तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी सुरक्षारक्षक ग्रुप समाजाच्या विविध घटकांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहे.समाजातील युवक शिक्षित व्हावा. अशी धारणा मनाशी ठेवत आदिवासी सुरक्षा रक्षक ग्रुप तालुक्यात गावागावात जनजागृती करीत आहे. आता या समाजाला दिशा देण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत असणे गरजेचे असल्याचे यावेळी रवींद्र वाघ यांनी सांगितले यावेळी तहसील कार्यालय येथे महसूल प्रतिनिधी यांना रवींद्र वाघ यांनी निवेदन दिले. यावेळी कार्यकर्ते वाल्मीक मोरे, युवराज मोरे, अनिल वाघ, महेंद्र मोरे, सुनिल बागुल, वासुदेव सोनवणे, करण सोनवणे, रतिलाल भील, दादू भील आदि उपस्थित होते.
छाया -पारोळा -महसूल प्रतिनिधी यांना निवेदन देताना रवींद्र वाघ यांच्यासह पदाधिकारी


