देशात भटक्या कुत्र्यांची समस्या बिकट होत चालली असून कुत्र्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना गेल्या काही काळात समोर आल्या आहेत. यावर हायकोर्टाने आता महत्वाचा निर्णय दिला आहे.
आता कुत्र्या चावल्यास त्याच्या दाताच्या प्रत्येक खुणेसाठी 10 हजार रुपये तर मांस बाहेर आल्यावर सरकारला भरपाई द्यावी लागणार आहे.
पहा किती मिळणार भरपाई
एका प्रकरणाच्या सुनावणीत हरियाणा आणि पंजाब हायकोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. भटका कुत्रा चावल्यास दाताच्या प्रत्येक खुणेसाठी 10 हजार रुपये,
तर शरीरावर जखमेचे व्रण किंवा 0.2 सेंटीमीर मांस जरी बाहेर आले असेल तर किमान 20 हजार रुपये भरपाई देण्यात यावी असे हायकोर्टाने म्हटले आहे.
एवढेच नाही तर कुत्रे चावल्याच्या घटनांची नोंद करण्यासाठी एक समिती स्थापन करावे असे निर्देशही हायकोर्टाने राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांना दिले आहेत.
भटके कुत्रे चावण्याच्या प्रकरणात प्रशासन जबाबदार असेल असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. तसेच राज्य सरकारने जबाबदारी घेत याप्रकरणी नियम बनवावेत असे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.