पुणे- पोलीस वृत्त ऑनलाईन: पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकला जीपने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांचावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास मंचरजवळ अपघात झाला. दाट धुक्यामुळे जीपचालकला अंदाज न आल्याने जीपने पाठीमागून ट्रकला धडक दिली.
सटाणा तालुक्यातील सायखेडा येथून पुण्याकडे निघालेल्या जीपने पाहाटे पाचच्या सुमारास ट्रकला मागून धडक दिली. दाट धुक्यामुळे जीपचालकाला अंदाज आला नाही. जीप चालक पंकज खंडु जगताप (pankaj jagtap) (वय ३६), मधुकर तुकाराम अहिरे (madhukar Tukaram ahire) (वय ५२), शांताराम संभाजी अहिरे (shantaram Sambhaji ahire) (वय ५० सर्व रा. सायखेडा, ता. सटाणा, जि. नाशिकः) यांचा मृत्यू झाला. जखमींना मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार राजेंद्र हिले आणि पोलीस शिपाई मोमीन यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने मदतकार्य सूरू केले. वाहनांना रस्ता मोकळा करुन दिला. दाट धुके असल्याने अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी

