अहमदाबद: पोलीस वृत्त ऑनलाईन– रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे गुजरातमधील विविध जिल्ह्यांमध्ये कहर पाहायला मिळत आहे. वीज पडून 20 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी ही माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी गुजरातमधील विविध शहरांमध्ये खराब हवामान आणि वीज पडून झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि सांगितलं की,स्थानिक प्रशासन मदत कार्य करत आहे. स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन्स सेंटर (SEOC) च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या विविध भागांतून आतापर्यंत एकूण 20 पावसामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. दाहोद जिल्ह्यात चार, भरूचमध्ये तीन, तापीमध्ये दोन आणि अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाद, खेडा, मेहसाणा, पंचमहल, साबरकांठा, सूरत, सुरेंद्रनगर आणि देवभूमी द्वारका येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला अशी माहिती एसईओ अधिकाऱ्याने दिली आहे.

