अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– भारतीय संविधान दिवस व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त..सामाजिक एवम खेळ मंत्रालय विभाग अंतर्गत एकात्मता माध्यमिक विद्यालय शहापूर येथील विद्यार्थिनींचे ॲनिमिया टेस्ट व आरोग्य तपासणी करण्यात आली.
ज्या देशातील महिला,मुली सक्षम आणि सुरक्षित असतील तो देश विकसित महासत्ता बनत असतो. मुलींचा आरोग्याचा विचार करून विद्यार्थिनींचा ॲनिमिया तपासणी करण्यात आले यामध्ये एकूण 45 विद्यार्थ्यांनीच ॲनिमिया टेस्ट व आरोग्य तपासणी करण्यात आली.
आरोग्यवर्धिनी केंद्र शहापूर येथील. डॉक्टर सौ कल्पना बडगुजर मॅडम यांनी मुलींनी आपल्या आरोग्यचीं काडजी कशी घावी व स्वतःचे रक्त वाढवण्यासाठी आपला आहार काय असावा याविषयी विशेष मार्गदर्शन केले. यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक श्री धनगर सर शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. तसेच नेहरू युवा केंद्र अंमळनेर तालुका समन्वयक प्रा. सौं वैशाली दिपक पाटील हे देखील उपस्थित होते.


