अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून पोलीस २४ तास जनतेची सेवा करत असतात. कायम कामाचा ताण आणि टीकेचं धनी व्हावंच व्हावं लागत पोलीस आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असतात.अलीकडे गुन्हेगारी बोकडली आहे. परंतु प्रशासनात वर्दीतील काही गर्दी अधिकारी असल्यामुळे ते गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरत आहेत. विविध गुन्ह्यातील आरोपींचा पर्दाफाश करून आपली चोख कामगिरी दाखवत, शिरूड येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी आपली उज्वल कामगिरीचा परिचय दिला आहे. अशा या दबंग अधिकाऱ्याच्या कामगिरीला सलाम अमळनेर तालुक्यातील शिरुड गावचे भूमिपुत्र तरुण तडफदार नागपूर येथे कर्तव्य असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी एका हत्येचा तपास करत पिस्तूल पुरवठा करण्यापासुन तर ग्राहक शोधा पर्यंत पोहोचले त्यांच्या दबंग कामगिरी बाबत गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
नागपुर मोमीनपुऱ्यातील हत्या प्रकरणाचा तपास करताना आरोपींकडून २१ पिस्तूल आणि १६५ काडतुसे जप्त केली. आतापर्यंत १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील अवैध पिस्तूल खरेदी-विक्रीच्या रॅकेटचा भंडाफोड केला. ही गावासाठी अभिमानास्पद बाब आहे. ग्रामीण भागात कमी सुविधा असताना जिद्दीच्या जोरदार झालेला एक पोलीस अधिकारी व आज त्याच्या कर्तुत्वाचे धडाकेबाज कामगिरीचे सर्व वस्तरावरून कौतुक होत आहे. याबाबत गावासाठी अभिमानास्पद बाब आहे. या भूमिपुत्राने गावाचे नाव उंचावले आहे. बाबत गाववाशियांनी त्यांचे कौतुक केले व ग्रामपंचायत तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांची उपस्थिती होती.


