पोलीस वृत्त ऑनलाईन: पाकिस्तानमधील कराची येथील एका शॉपिंग मॉलला शनिवारी (दि.२५) आग लागली. कराचीच्या रशीद मिन्हास रोडवरील आरजे मॉलमध्ये लागलेल्या या आगीत ११ जण ठार, तर एक जण जखमी आहेया आगीच्या दुर्घटनेतून २२ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना कराची येथील जेपीएमसी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ ने दिली आहे.


