जळगाव- पोलीस वृत्त ऑनलाईन: शहरातील पांजरपोळ संस्थेत, द्वारकाई फाउंडेशन जळगाव, रोटरी क्लब मिड टाउन, जळगाव व पांजरपोळ संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने गोमाता पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सुरुवातीला संस्थेच्या प्रवेशद्वारावर व माता पूजन विजय बनसोडे तहसीलदार जळगाव श्री दादा महाराज जोशी संस्थापक चिमुकले राम मंदिर किशोर सूर्यवंशी अध्यक्ष द्वारकाय फाउंडेशन दिलीप गांधी विश्वस्त पांजरापोळ संस्था यांच्या शुभ हस्ते सह पत्नी पूजन करण्यात आले नंतर गोमातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत शेकडो सेवकांची उपस्थिती होती त्यानंतर संस्थेच्या सभागृहात उपस्थितांचा गुणांनुवाद कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष दादा महाराज जोशी मुख्य अतिथी विजय बनसोडे साहेब विजय काबरा अध्यक्ष विश्वस्त दिलीप गांधी नारायण वाणी उपाध्यक्ष, किशोर सूर्यवंशी अध्यक्ष द्वारकाई फाउंडेशन राजेंद्र कुलकर्णी अध्यक्ष रोटरी जळगाव, डॉक्टर राहुल मयूर असिस्टंट गव्हर्नर रोटरी, एकनाथ भाऊसाहेब पाटील संस्थापक पांजरपो संस्था चिंचोली, यांची उपस्थिती होती
जळगाव तहसीलदार श्री विजय बनसोडे साहेब यांनी कार्यक्रमाचा गुण गौरव करून संस्थेत शासकीय आर्थिक मदत करण्याचे सांगितले तसेच प्रास्ताविक पांजरापोळ संस्थेचे दिलीप गांधी यांनी केले, श्री दादा महाराज यांनी गोपाष्टमी चे महत्व पटवून दरवर्षी गोपाष्टमीचा कार्यक्रम द्वारकाई फाउंडेशनच्या वतीने घेण्याविषयी आग्रही भूमिका मांडली व कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, गाईचे संगोपन करताना संस्थेस आर्थिक मदत व लोकांच्या सेवेसाठी सहभाग घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली, पांजरा पोळसंस्था चिंचोली तालुका यावल यांनी संस्थापक दरवर्षी कार्यक्रम घेण्याविषयी व कार्यक्रमास मदत करण्याचे आश्वासन दिले.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वारकाई फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर सूर्यवंशी यांनी केले व त्यांच्या परिवाराकडून एक ढेपेचे पोतं व गुळाची भेली गाईंना खाऊ घालण्यात आली.
सदरचा कार्यक्रमास उपस्थिती लक्ष्मीकांत वाणी बाळासाहेब अग्रवाल मनीष पाटील किनगाव रोटरी असिस्टंट गव्हर्नर डॉक्टर राहुल मयूर शंकर भाई पटेल डॉक्टर वर्जेकर श्रीरंग पाटील सुरेंद्र छाबडा सुरेंद्र असावा महेंद्र चौधरी निराधार चौधरी अनिता सूर्यवंशी मृणाल चित्ते सुनंदा चौधरी डॉक्टर सुमन लोढा कृतिका सूर्यवंशी डॉक्टर प्रकाश चित्ते डॉक्टर मनोज पाटील आरो चौधरी शांताराम खोंडे भगवान उके सुभाष खोंडे बडोदा हेमंत पाटील दिलीप कोळी नांद्रा पंढरीनाथ पाटील पिंपळे अनिल अग्रवाल इत्यादींची उपस्थिती होती


