पोलीस वृत्त ऑनलाईन: पुण्यात पाठलाग करत कोयत्याने एका तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आला आहे. किरकोळ वादातून पाठलाग करून कोयत्याने हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला.
पुण्यातील गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री ही घटना घडली. सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि आरोपींचे वाद झाले होते. आरोपी कोयते घेऊन त्याच्या मागे लागले. तो ओसवाल बिल्डिंगच्या छतावर गेला असता आरोपींनी त्याला एकटे गाठत वार करून खून केला. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

