जळगाव पोलीस वृत्त ऑनलाईन: दि.26 रोजी जळगाव रेल्वस्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वर k.m no.420/3-5 जवळ १:४० वाजता बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने सदर इसमास ऑन ड्युटी स्टेशन मास्तर जळगांव यांचे लेखी मेमो वरून पुढील कार्यवाही करिता सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथे नेहले असता तेथील ऑन ड्युटी डॉक्टरांनी त्यास तपासून मयत गोषित केले आहे. तरी सदर मयतावर PM होणे कामी सिव्हील हॉस्पिटल जळगांव येथील शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आले आहे तरी सदर मयत यांची ओळख पटली नसून व त्याची ओळख पटवणे कमी नागरिकांना ओळख पटवन्याचे आवाहन रेल्वे पोलीस जळगांव मार्फतीने करण्यात येत आहे मयताचे वर्णन अंदाजीत वय ४०ते ४५, डोक्याची केस काळे बारीक कापलेले, चेहरा शाबीत असून डोळे उघळे तोंड अर्धवट उगळे रंग सावळा, मान शाबीत शरीर बाधा सळपातळ उंची 5 बाय 2 अंगात लाल रंगाचे टी शर्ट, काळया रंगाची नाईट मळकट पँट, पायात ग्रे रंगाचे सॉक्स घातलेले पुढील तपास लोहमार्ग पोलीस नरेंद्र चौधरी करीत आहे.


