अमळनेर: पोलीस वृत्तऑनलाईन– तालुक्यातील निसर्डी धरणात खडके येथील सरपंचाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना 28 रोजी रात्री घडली असून अमळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

खडके येथील सरपंच भिवराज शिवन भिल(Bhivraj shivan bhil) (वय 55) हे 28 रोजी सायंकाळी निसर्डी धरणावर मासेमारी साठी गेले असल्याची माहिती असून सकाळी त्यांचे प्रेत तरंगताना दिसून आले. त्याची काठी, कपडे, चप्पल काठावर पडलेले होते. सुनील ठाकरे याने अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.

