अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– शिरुड येथील स्व:दादासो. विनायकराव झिपरू पाटील हायस्कूल येथे वनविभाग अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह उत्साहात झाला. यात वन्यप्राण्यांचे निसर्गामधील महत्त्व याबाबत वनपरीक्षत्र अधिकारी पारोळा श्री.एस.बी .देसले साहेब ,श्री.पी.जे. सोनवणे साहेब(वनपाल ,अमळनेर), श्री.आर.एस. वेलसे ( वनरक्षक ) , श्री .विवेक देसाई (मानद वन्यजीव रक्षक ) , श्री,जे .व्ही.ठाकरे( वनरक्षक ),श्री.एस. पी.देवरे,वनरक्ष,श्री.वसंत पाटील ,शिरुडकर यांनी मार्गदर्शन केले. १ ते ७ ऑक्टोबरला वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा होतो. वन्यप्राण्यांचे महत्त्व लोकांना कळावे यासाठी वन विभाग हा कार्यक्रम राबवते. निसर्गामध्ये वन्यप्राण्यांचे अस्तित्व टिकून राहावे, वन्यप्राण्यांचे स्थान संकटात आल्यास निसर्गाचा समतोल पूर्णपणे बिघडेल यासाठी वन्यजीवांचे अस्तित्व मानून तसे वर्तन अंगिकारले पाहिजे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याध्यापक श्री. आर. ए. शिंदे यांनी जागतिक वन्य जीवसवंर्धन साठी भारताचे योगदान बद्दल माहिती दिली. निबंध स्पर्धा घेण्यात आली व वन्य प्राण्यांची माहिती साठी व्हिडिओ प्रोजेक्टर वर दाखविला. कार्यक्रम यशवितेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले. वरील माहिती श्रीमती. पुष्पलता अशोक पाटील. (स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन) यांनी पत्रकान्वये दिली. सप्ताह प्रसंगी शाळेतील विद्यार्थी ,शिक्षक ,शिक्षिका शिक्षककेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचलन श्रीमती योगिता देशमुख मॅडम यांनी केले. श्रीमती सविता बोरसे मॅडम यांनी केले आभार मानले


