यावल: पोलीस वृत्त ऑनलाइन तरुणांच्या लग्नाबाबतचा प्रश्न हा मोठा गंभीर झाला असून लग्न जुळवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अनेक तरुणांचे वय निघून गेले असता अद्यापही लग्न झालेले नाही. यावल तालुक्यातील घटना समोर आली आहे. लग्न होत नसल्यानेनैराश्यात गेलेल्या तरुणाने टोकाचा निर्णय घेतला. तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेल्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बळीराम अरूण पाटील (वय ३०, रा. दोनगाव ता. यावल) असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यावल तालुक्यातील दोनगावमध्ये बळीराम पाटील हा तरूण वृध्द आईवडीलांसह वास्तव्याला होता. रविवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याचे वृध्द आई वडील घराबाहेर बसलेले असतांना आपल्या राहत्या घरातील मधल्या खोलीच्या छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्न होत नसल्याने हा तरुण नैराश्यात होता. बळीराम हा अरुण पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी केली. याप्रकरणी विवेक धनराज पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. याबाबत पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार असलम खान व पोलीस करीत आहे.