पुणे: शहरात नात्याला काळीमा फासणारी खळबळजक घटना समोर आली असून सख्ख्या भावाकडून बहिणीवर आत्याचार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. घरात राहणाऱ्या २४ वर्षाच्या भावाने आपल्या लहान असलेल्या १४ वर्षांच्या सख्ख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केले.

यातून सदर मुलगी गर्भवती राहिली आणि तिला बाळ झाले आहे. या प्रकारानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
अधिक माहितीनुसार, ही घटना पुण्यातील वानवडी परिसरामध्ये घडली असून सदर कुटुंब हे मूळचे कर्नाटक येथील आहे. कुटुंबातील महिला धुणे भांड्याची कामे करते तर पती आणि मुलगा वॉचमन म्हणून काम करतात. महिलेची मुलगी शाळेत जाते. आई आणि वडील कामावर गेल्यानंतर आरोपी भाऊ घरी कुणी नसल्याचा फायदा घेत लहान बहिणीवर अत्याचार करत होता.
मागच्या साधारण एका वर्षापासून हा प्रकार सुरू होता पण बहिणीने ही गोष्ट कुणाला सांगितली नाही. लैंगिक आत्याचारात ती गर्भवती राहिली. तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला दवाखान्यात नेण्यात आल्यावर ती गर्भवती असल्याचं डॉक्टांनी सांगितलं. काही वेळातच तिला प्रसुतीच्या कळा येऊ लागल्या आणि तिने एका बाळाला जन्म दिला.
सदर घटना घडल्यानंतर आईने वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार वानवडी पोलिसांनी २४ वर्षांच्या क्रूर भावावर गुन्हा दाखल केला आहे.

